Beed News: 'आम्ही Suresh Dhas चे कार्यकर्ते म्हणत हाणलं', Shirur मध्ये चाललंय काय? | Sakal K1
बीड जिल्ह्यातील मारहाणीच्या घटना थांबण्याचे नाव नाही. शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागऱ्याची वाडी परिसरात किरकोळ पैशाच्या व्यवहारातून एक गंभीर प्रकार घडला आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींनी पीडित शिवाजी शिंदे यांना थेट घरातून उचलून नेले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून हनुमान मंदिरासमोर लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करण्यात आली. हा हल्ला जीव घेण्याच्या उद्देशाने केल्याचे स्पष्ट होत असून, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पीडित शिवाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण घटना सांगितली असून, शिरूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.