सहा दिवसा पासून फरार असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले अखेर पोलिसांच्या हाती सापडलेला आहे. पुणे ते प्रयागराज पर्यंतचा प्रवास बसने करून, नंतर प्रयागराज मधून पळ काढण्याचा डाव त्याने रचला होता, पोलिसांनी त्याचा तपास घेऊन त्याला प्रयागराजमध्येच बेड्या ठोकल्या. तसेच आज वन विभागाच्या गट क्रमांक 51 वर खोक्यानं अतिक्रमण करून बांधलेल्या ग्लास हाऊसवर वनविभागाकडून बुल्डोजर फिरवण्यात आला. तर, वन विभागाच्या जागेत घर बांधल्या प्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकी हक्क दाखवण्यासाठी खोक्याला वनविभागाकडून सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जर खोक्या कडून सात दिवसात मालकी हक्काचा दावा दाखल न झाल्यास वनविभागाकडून अतिक्रमण काढण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.