walmik karad news। ranjeet kasle यांचे आरोप, karuna munde म्हणाल्या... । beed

बीडचे निलंबित पीआय रणजित कासले यांचा मोठा गौप्यस्फोट; ५० कोटींच्या एन्काऊंटर डीलचा दावा, करुणा मुंडेंचं धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप..

बीडचे निलंबित पीआय रणजित कासले यांचे रोज नवनवे व्हिडीओ येत आहेत. या व्हिडीओंच्या माध्यमातून ते पोलिस खात्यातील खळबळजनक गोष्टी बाहेर काढत आहेत. या व्हिडीओद्वारे कासले विविध धक्कादायक खुलासे करत आहेत. अलीकडेच त्यांनी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा मुद्दा समोर आणला आहे. कासले यांनी दावा केला आहे की, कराडच्या एन्काऊंटरसाठी त्यांना ऑफर देण्यात आली होती. या कारवाईसाठी तब्बल ५० कोटी रुपयांची रक्कम देण्याचं आमिषही दाखवण्यात आलं होतं, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या खुलाशाने राज्याच्या राजकारणात आणि पोलिस यंत्रणेत मोठा भूकंप घडवला आहे. या प्रकरणात आता नवं वळण आलं आहे. करुणा मुंडे यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण आहे कासले? आणि या सगळ्यामागचं राजकारण काय? हे प्रकरण नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com