Pune BJP नं ४२ जणांना डावललं, दिग्गजांना डायरेक्ट घरी बसवलं,नव्या पॅटर्नची चर्चा | Mahapalika Election | Sakal News

Mahapalika Election: नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा नवा फॉर्म्युला; छत्रपती संभाजीनगर–नाशिकमध्ये निष्ठावंतांचा आक्रोश, तर पुण्यात ४२ विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापून दिग्गजांना ‘घरी बसवल्याने’ राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा..

भाजपने यंदा उमेदवारी देताना “नव्या चेहऱ्यांना संधी” हा नवा पॅटर्न राबवला असून, त्याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये या निर्णयाविरोधात उघड आक्रोश पाहायला मिळतोय. मात्र पुण्यात भाजपच्या या नव्या रणनीतीची वेगळीच चर्चा रंगली आहे. पुण्यात भाजपने मोठा निर्णय घेत विद्यमान नगरसेवकांची तिकिटं कापत नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे, यावेळी तब्बल ४२ विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. याशिवाय काही आमदार आणि पक्षातील बड्या नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “घराणेशाहीला फाटा” देत संघटनात्मक बदल घडवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. नेमके कोणते दिग्गज या निर्णयामुळे बाहेर बसले? कोणत्या विद्यमान नगरसेवकांना तिकीट मिळालं नाही? याबाबतचा सविस्तर आढावा आणि राजकीय घडामोडी व्हिडीओतून पाहूयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com