
Kishor kadam story: "घर... फक्त चार भिंती आणि छप्पर नाही... ते असतं आयुष्यभराची जपलेली स्वप्नं, आठवणी, ओळख.
आणि जेव्हा तेच घर हातातून निसटण्याच्या उंबरठ्यावर उभं राहतं, तेव्हा माणूस कोणत्याही मर्यादा ओलांडून मदतीसाठी हाक मारतो...
अगदी तसंच, काही दिवसांपूर्वी एका मराठी कलाकाराची हाक ऐकू आली...
कला, कविता आणि अभिनयाच्या विश्वात ज्याचं नाव आदराने घेतलं जातं, ‘नटरंग’, ‘फॅन्ड्री’, ‘जोगवा’, ‘जारण’सारख्या चित्रपटांनी ज्याने मराठी आणि हिंदी पडद्यावर वेगळेपणा जपला... तो म्हणजे किशोर कदम.
त्यांचा आवाज काव्याचा, त्यांची कला जीवनाची, पण आज ते स्वतःच्या हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत.
मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचला, आदेशही निघाले... पण हा प्रवास किती लांब आहे, ते वेळच सांगेल.
पण, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या कलाकाराच्या घराचा प्रश्न राज्याच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला..
एक किस्सा असा आहे, की ज्यात संपूर्ण मंत्रालय मध्यरात्री जागं झालं होतं आणि मुख्यमंत्री स्वतः एका कलाकारासाठी फाईल्स चाळत होते...