Diabetes Control: डायबेटिस झाला म्हणजे आयुष्यभर औषधं घ्यावीच लागणार का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी महागड्या डाएट प्लॅनचीच गरज आहे का? तर याच प्रश्नांची उत्तरं देणारं एक महत्त्वाचं संशोधन समोर आलंय. विशेष म्हणजे, या संशोधनात परदेशी डाएट किंवा काही अतिशय वेगळे प्रयोग केलेले नाहीत. तर आपल्या घरात रोज बनणाऱ्या पोळ्या, डाळी, कडधान्यं, पालेभाज्या, फळं आणि सोबत नियमित चालण्याचा व्यायाम यांचा आधार घेण्यात आलाय. या अभ्यासात सहभागी झालेल्या ८७ पैकी ५३ जणांमध्ये सहा महिन्यांनंतर औषधांशिवाय मधुमेह नियंत्रणात आल्याचं दिसून आलंय.म्हणजेच जवळपास दहापैकी सहा रुग्णांमध्ये डायबेटिस रेमिशनची अवस्था साध्य झाली. पण हा अभ्यास नेमका कसा करण्यात आला? रोज चालण्याचा यामध्ये किती मोठा वाटा होता? आणि आपल्या पारंपरिक आहारात असे कोणते बदल करता येतील, ज्याचा मधुमेह नियंत्रणासाठी फायदा होऊ शकतो? चला, समजून घेऊया...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.