Pune News: Sharad Pawarचा उमेदवार, एकाट्याला गाठलं अन्.. काय घडलं? | Mahapalika Election | Sakal News

Pune News: दौंड शहरातील नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या पराभूत उमेदवार आफताब सय्यद यांच्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं? बघा व्हिडीओ..

दौंड शहरात नगरपरिषद निवडणूक लढवणाऱ्या पराभूत उमेदवारावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील उमेदवार आफताब सय्यद यांच्यावर भरचौकात हल्लेखोरांनी अचानक मारहाण केली. ही मारहाणीची घटना दौंड पोलीस ठाण्यासमोरच घडली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी टोळक्याच्या धिंगाण्यावर संताप व्यक्त केला असून संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलीस तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com