Pune News: कामाच्या घाईत मोठी चूक! आईसमोरच मुलगा गेला, नेमकं काय घडलं? | Aryan Jadhav | Sakal News

Pune News: दौंड शहरात डांबरीकरणाच्या कामातील निष्काळजीपणाचा बळी! जनता कॉलनीत रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या आर्यन जाधवचा दुर्दैवी मृत्यू, आई समोरच घडली हृदय पिळवटून टाकणारी घटना..

दौंड शहरात मन हेलावून टाकणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शहरातील जनता कॉलनी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान चार वर्षांचा आर्यन जाधव याचा रोड रोलरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दौंड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जनता कॉलनी भागात सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर डांबरीकरणाचं काम सुरू होतं. याचवेळी आर्यन जाधव हा परिसरात खेळत असताना किंवा रस्त्यावर वावरताना रोड रोलरखाली सापडला. रोड रोलर थेट आर्यनच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे आर्यनची आई त्याच ठिकाणी मजूर म्हणून काम करत होती. डोळ्यादेखत आपल्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाल्याने आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की काम लवकर उरकण्याच्या घाईत रोड रोलरचा वेग अधिक होता. तसेच रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद न करता डांबरीकरणाचं काम सुरू होतं. सर्वात गंभीर म्हणजे कोणतेही सुरक्षात्मक उपाय, सूचना फलक, कठडे किंवा बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते. या निष्काळजीपणामुळे एका गरीब मजूर कुटुंबाने आपलं चिमुकलं बाळ गमावलं आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित ठेकेदार आणि कामाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दौंड शहरात घडलेल्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा सार्वजनिक कामांदरम्यान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com