Nashik News: दोन हजारांच्या नोटांचा कंटेनर, किडनॅपिंग, दरोडा आणि कल्याण कनेक्शन | Sakal News

Nashik News: नोटबंदीच्या बंद नोटांचं महाभारत! दहा वर्षांनंतर ४०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटांचा कंटेनर लुटीमुळे तीन राज्यांत खळबळ, नाशिक पोलीस संशयाच्या भोवऱ्यात..

२०१६ मध्ये केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेत ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. मात्र या बंद झालेल्या नोटांवरून तब्बल जवळपास दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा खळबळजनक ‘महाभारत’ उभं राहिलं आहे. तब्बल ४०० कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेल्या एका कंटेनरमुळे तीन राज्यांचं राजकीय आणि प्रशासकीय वातावरण हादरून गेलं आहे. गेल्या वर्षी कर्नाटकात २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला तब्बल ४०० कोटी रुपयांचा कंटेनर लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या कर्नाटक पोलीस करत आहेत. मात्र तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसं या प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळत आहे. आता या कंटेनर लूट प्रकरणात थेट नाशिक पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई फिरू लागली आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आणखी एका राज्यात या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. नेमकं हे ४०० कोटींचं काळं आर्थिक जाळं काय आहे, कंटेनर कुठून आला, कुणासाठी होता आणि लुटीमागे नेमके कोण आहेत, याचा उलगडा आता तपासातूनच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com