२०२४ विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपलं नेतृत्व सिद्ध केलं. त्यांच्या कार्य कर्तृत्वाने भाजपला 132 जागांवर विजय मिळवून दिला. यंदा शिवसेनेच्या फुटीनंतर, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपला कोणतीही राजकीय तडजोड करावी लागली नाही. त्यामुळे आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत.
भाजपच्या या यशामध्ये संघाची भूमिका देखील महत्त्वाची मानली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसच्या नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या. संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबत निवडणुकीनंतरही झालेली भेट चर्चेत आहे.
समंदर लौट आया... या शब्दांसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात नवी दिशा आणि नवं युग पाहायला मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपलं नेतृत्व आणि चाणक्यपण सिद्ध केलं आहे. आता त्यांची पुढील वाटचाल आणि महाराष्ट्राचा विकास कसा घडतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.