Devendra Fadnavis : शिवसेना नेमकी कुणाची? फडणवीसांचं निर्णयाबाबत मोठं वक्तव्य

शिवसेना-राष्ट्रवादीच्या नाव-चिन्ह वादावर फडणवीसांचा विश्वास; २०२४ निवडणूक निकाल आणि पुढील राजकीय घडामोडींना सर्वोच्च न्यायालयही मान्यता देईल, असा दावा

जालन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनाव व चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयही याच भूमिकेला दुजोरा देईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नेमकं काय म्हणाले? बघा हा व्हिडीओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com