रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. रुग्णवाहिकेतून विद्यार्थ्यांचे मृतदेह आळंदीत पोहोचताच कुटुंबीय आणि पालकांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थित सर्वांचीच मने हेलावून गेली. या हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण आळंदी परिसर अत्यंत शोकाकुल वातावरणात बुडाला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमधून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे गांभीर्य आणि मृतांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आज आळंदी शहरातील सर्व व्यवहार, बाजारपेठा आणि दुकाने स्वयंस्फूर्तीने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरला असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थोड्याच वेळात शोकाकुल वातावरणात या विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.