E20 पेट्रोल धोरणावरून राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी घोषणाबाजी करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. E20 इंधनामुळे वाहनधारक, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार, यावरून विरोधकांनी सरकारला सवाल केले. गोंधळाच्या वातावरणातही नितीन गडकरी यांनी आपले भाषण सुरू ठेवत E20 धोरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. संसदेतील या घडामोडींमुळे E20 इंधनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विरोधकांचा आक्रमक पवित्रा, राज्यसभेतील गोंधळ आणि गडकरींचे उत्तर यामुळे हा विषय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. संसदेत नेमकं काय घडलं, विरोधकांनी कोणते मुद्दे उपस्थित केले आणि गडकरींनी काय स्पष्टीकरण दिलं. बघा हा व्हिडीओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.