Sunny Waghchaure ला Lawrence Bishnoi Gang कडून 5 कोटीच्या खंडणीसाठी फोन | PCMC News | Sakal News

PCMC News: पिंपरी-चिंचवड हादरले: ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरेला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून ५ कोटींच्या खंडणीसाठी कॅनडातून धमकी; 'पाच दिवसांत पैसे दिले नाहीत तर बाबा सिद्दिकीसारखा हाल करू' असा खळबळजनक मेसेज, पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल, गुंडाविरोधी पथकाकडून तपास सुरू..

पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध ‘गोल्डन मॅन’ सनी वाघचौरे यांना कुख्यात लॉरेन्स बिष्णोई गँगकडून ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सनी वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दाखल केला असून, शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी पहिला धमकीचा फोन कॅनडातील एका क्रमांकावरून आला होता. या फोनमध्ये स्वतःला बिष्णोई गँगमधील शुभम लोणकर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर २६ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता कॅनडामधीलच दुसऱ्या क्रमांकावरून सनी वाघचौरे यांच्या मोबाईलवर धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये, 'राम राम… मी शुभम लोणकर, लॉरेन्स बिष्णोई ग्रुपमधून बोलतोय. तुझ्यापासून ५ कोटी हवेत. सनी भागले तरी तुला वाचवणारी जगातली कोणतीही ताकद नाही. तुला पाच दिवसांचा वेळ आहे. तयार राहा, गोळी कुठूनही येऊ शकते. जर उत्तर दिलं नाहीस तर तुझा बाबा सिद्दिकीसारखा हाल करू. आणि तू जितकं सोनं घालतोस ना, त्यापेक्षा जास्त पितळ भरू… लक्षात ठेव.' असा गंभीर आशय असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या धमक्यांनंतर सनी वाघचौरे यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. सध्या पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांचे गुंडाविरोधी पथक या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासही सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Shyam Sundar Bishnoi RAS Success Story
Pune Road Safety Under Threat as Katraj Kondhwa Road Sees 51 Accidents and 21 Deaths Amid Ongoing Widening Work
Kolhapur Police
Marathi News Esakal
www.esakal.com