उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये १० वर्षीय वैभव वर्माच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, या प्रकरणातील आरोपी संगणक शिक्षकाने कथितरित्या AI तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्याची तयारी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, खंडणीचा कट, बनावट ओळख, व्हर्च्युअल मोबाइल नंबर आणि डिजिटल पुरावे या प्रकरणाच्या तपासात समोर आले आहेत. वैभव बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि त्यानंतर आरोपीपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात AI चा कथित वापर, डिजिटल पुरावे आणि हत्येच्या तपासातील महत्त्वाच्या घडामोडी यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. जाणून घ्या गोरखपूरमधील या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आणि पोलिसांच्या तपासात समोर आलेली महत्त्वाची माहिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.