भजनात नेमकं काय घडलं? Kailas Gorantyal यांनी दिलं स्पष्टीकरण

Kailas Gorantyal: भजनात तल्लीन होऊन नाचले भाजप नेते कैलास गोरंट्याल; नोटांच्या उधळणीच्या व्हायरल व्हिडिओवर माजी आमदारांनी दिले थेट स्पष्टीकरण.

BJP Leader Kailas Gorantyal: जालना शहरातील ऐतिहासिक मंमादेवी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक भजनाच्या कार्यक्रमात भाजपचे नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा एक अनोखा आणि चर्चेतील अंदाज पाहायला मिळाला. भजनाच्या भक्तीमय वातावरणात गोरंट्याल स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्यांनी भजनाच्या तालावर ठेका धरला. याच दरम्यान उपस्थितांकडून त्यांच्यावर नोटांची उधळण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी यावर आपले मौन सोडत स्पष्टीकरण दिले. "भजनामध्ये माणूस जेव्हा तल्लीन होतो, तेव्हा तो पूर्णपणे मंत्रमुग्ध होतो," असे सांगत त्यांनी आपल्या या दिलखुलास नृत्याचे समर्थन केले. या संपूर्ण व्हायरल घटनेचा आणि त्यांच्या स्पष्टीकरणाचा घेतलेला हा खास मागोवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com