Kalyan Crime News: दोन वर्ष फरार, कपाट उघडलं अन्.. बिल्डरला ठोकल्या बेड्या...

कल्याणमध्ये गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरक्षित भूखंडांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती उभारल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या डोलारेला कल्याण क्राईम ब्रँचने धाडसी कारवाई करत अटक केली.

कल्याणमध्ये गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात बिल्डर सलमान डोलारे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आरक्षित भूखंडांवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती उभारल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेल्या डोलारेला कल्याण क्राईम ब्रँचने धाडसी कारवाई करत अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण पश्चिमेतील एका फ्लॅटवर छापा टाकला असता सलमान डोलारे घरातील कपाटात लपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. सलमान डोलारेविरोधात बाजारपेठ आणि महात्मा फुले पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल असून, अनधिकृत बांधकामे, खोटी कागदपत्रे आणि संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. या अटकेमुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? पाहा हा व्हिडिओ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com