एका Tiffin पासून Cloud Kitchen पर्यंत! कविता यांचा प्रेरणादायी प्रवास

Sucess Story: परदेशातील नोकरी सोडली, एका टिफिनपासून उभारले क्लाउड किचन; संकटांवर मात करत महिला उद्योजिका कविता यांनी रचला यशाचा नवा इतिहास.

Women Entrepreneur Success Story: आयुष्यातील प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करत स्वतःची नवी ओळख निर्माण करणाऱ्या कविता यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आहे. पतीच्या निधनानंतर अवघ्या पाच वर्षांच्या मुलीची संपूर्ण जबाबदारी सांभाळत त्यांनी परदेशात नोकरी केली आणि स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. त्यानंतर २०१८ मध्ये भारतात परतत त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडली आणि आपल्या आवडीला प्राधान्य देत एका टिफिनपासून व्यवसायाची सुरुवात केली. त्यांच्या या छोट्याशा प्रयत्नाचे आज एका यशस्वी 'क्लाउड किचन' (Cloud Kitchen) आणि 'केटरिंग बिजनेस'मध्ये रूपांतर झाले आहे. आज जवळपास २० महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला असून, ग्राहकांच्या विश्वासावर त्यांचा व्यवसाय वेगाने वाढला आहे. व्यवसायासोबतच अन्नदानाच्या माध्यमातून समाजसेवा करत असलेल्या कविता यांच्या जिद्दीचा, आत्मविश्वासाचा आणि मेहनतीचा हा प्रवास महिला उद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...