अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे' अनुदान अचानक बंद झाल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. जनवादी महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी रस्त्यावर उतरून अकोले तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. ई-केवायसी (e-KYC) आणि तांत्रिक कारणांचा दाखला देत पात्र महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. गृहिणी, मोलमजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या आणि आदिवासी महिलांचे थकीत अनुदान तातडीने सुरू करावे, तसेच योजनेतील अटी व शर्ती शिथिल कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. यासोबतच अंगणवाडीतील पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आणि आशा सेविकांना थकबाकीसह नियमित मानधन देण्याची मागणीही मांडण्यात आली. मागण्या पूर्ण न झाल्यास २६ ऑक्टोबर रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.