महादेव मुंडे हत्या प्रकरणाला आता नवं आणि खळबळजनक वळण मिळालं आहे. या घटनेत महादेव मुंडेंचा खून त्यांच्या जवळच्या नात्यातील व्यक्तींनीच केल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. हा धक्कादायक खुलासा कोणी दुसरा नाही, तर वाल्मिकचा जुना सहकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर याने केला आहे. बाळा बांगरच्या म्हणण्यानुसार, महादेव मुंडेंचा खून केल्यानंतर त्याच्या मांसाचा तुकडा आणि रक्त वाल्मिकला दाखवण्यासाठी खास आणलं गेलं. हे पाहून वाल्मिकने शाबासकी दिल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आता थेट भूमिका घेत आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पोलिस आणि यंत्रणांवर दबाव वाढवत न्यायासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. हे सगळं प्रकरण काय जाणून घ्या व्हिडीओच्या माध्यमातून..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.