महाराष्ट्रात यंदा दुष्काळाचे संकट अधिक गंभीर होताना दिसत आहे. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, तूर आणि मका यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आता रब्बी हंगामातही पेरण्यांवर परिणाम झाला असून, ६० लाख हेक्टरपेक्षा अधिक सरासरी पेरणी क्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात उपलब्ध आकडेवारीनुसार केवळ १४ लाख २९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुसरीकडे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून, जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धताही चिंतेचा विषय बनली आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर संकट निर्माण झाले आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळाची आठवण करून देणाऱ्या या परिस्थितीत सरकारच्या उपाययोजना, शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत आणि कर्जमाफीचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. महाराष्ट्र या संकटातून कसा सावरणार ? बघा हा व्हिडीओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.