Amit Shah on Rahul Gandhi: निवडणूक मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनावरून (SIR - Special Intensive Revision) सुरू असलेला राजकीय संघर्ष तीव्र झाला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने १०४ पैकी ९० जागांवर मिळवलेल्या घवघवीत विजयाचा संदर्भ देत अमित शाह म्हणाले की, "काँग्रेस गुजरातमध्ये गेल्या ४१ वर्षांपासून पराभूत होत आहे, मग हाही SIR चाच परिणाम आहे का?" ईव्हीएम किंवा एसआयआरवर खापर फोडण्याऐवजी राहुल गांधींनी आपल्या पक्षाच्या सातत्यपूर्ण पराभवांचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी दिला. नकारात्मक राजकारणाचा पाठपुरावा करून आणि SIR च्या बहाण्याने घुसखोरांना पाठीशी घालून जनतेचा विश्वास जिंकता येणार नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसला २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतील चौथ्या पराभवासाठीही तयार राहण्याचा टोला लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.