Dattatray Bharne : शेतकऱ्यांचे ५ हजार रुपये रखडले? कृषिमंत्री दत्ता भरणेंनी दिलं मोठं आश्वासन!

शेतकऱ्यांच्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत कृषिमंत्री दत्ता भरणे यांची महत्त्वाची माहिती. ९७ लाख लाभार्थ्यांना मदत; रखडलेली रक्कमही मिळणार.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील तब्बल ९७ लाख लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा तांत्रिक अडचणी यांमुळे काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर बोलताना, तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सर्व पात्र शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रिम मदत दिली जाईल, असे आश्वासन दत्ता भरणे यांनी दिले. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नेमकी किती मदत वितरित झाली आणि कोणत्या कारणांमुळे काही शेतकऱ्यांची रक्कम रखडली, जाणून घ्या सविस्तर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra drought affected farmers payment date
Barshi Farmers Receive First Advance Relief as Maharashtra Begins Crop Loss Assistance Distribution Across the State
Karnataka farmer relief amount 2500 rupees
Farmer Relief Maharashtra Government Eases Eligibility Rules for 5000 Rupees Assistance to Farmers Before Diwali Festival