Ajit Pawar News: Ranjan Taware and Chandrarao Taware यांनी फासे फिरवले? | Sakal News

Ajit Pawar News: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप; औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाचा हवाला देत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा दावा..

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवार यांची निवड झाली आहे. मात्र, ही निवड बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप सहकार बचाव पॅनलचे नवनिर्वाचित संचालक चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की, औरंगाबाद खंडपीठाच्या एका निर्णयानुसार अजित पवार यांना चेअरमन म्हणून नियुक्त करता येत नाही. तरीही नियमबाह्य पद्धतीने त्यांची निवड करण्यात आली असून, ही निवड कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही तावरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या नेतृत्वावर आता नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com