Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

मनोज जरांगे पाटील यांच्या ‘चलो मुंबई’ हाकेनंतर मराठा आरक्षण आंदोलनाला वेग; अंतरवली सराटीतून मुंबईकडे कूच करण्याची तयारी, सरकारला दिला इशारा

मनोज जरांगे पाटील यांच्या ‘चलो मुंबई’च्या आवाहनानंतर मराठा आरक्षण आंदोलनाला पुन्हा वेग आला आहे. अंतरवली सराटीत दाखल झालेल्या मराठा बांधवांनी मुंबईत जाण्याची तयारी सुरू केली असून, सरकारने अडवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर विविध भागांतून मराठा समाजबांधव अंतरवली सराटीकडे दाखल होत आहेत. मुंबईकडे जाण्याच्या तयारीबाबत मराठा बांधवांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. सरकारकडून आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा वापर होण्याची शक्यता व्यक्त करत, वेगवेगळ्या मार्गाने मुंबई गाठण्याचा इशाराही काही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल आणि सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहा प्रतिनिधी योगेश काशिद यांचा विशेष रिपोर्ट...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com