Video : "माझ्या मुलीने टोकाचं पाऊल उचलले, अशी वेळ कोणावरही येऊ नये" | Rekha Kulkarni

तिने मला एक दिवस फोन केला आणि म्हणाली मला रात्रीची खूप भयानक स्वप्न पडतात, मला झोप येत नाही..

तिच्या आत्महत्येमागे कोणतीच एक घटना आम्हाला जाणवली नाही हे सांगत असताना प्राचीच्या आईने अनेक प्रसंग सांगितले.. त्या म्हणाल्या एकदा भावंडांची एका विषयावरून वादावादी सुरु होती त्यावेळी अचानक प्राची गाडीत जाऊन मोठ्याने रडू लागली. तिने त्यावेळी मला सांगितलं की, लहानपणी तिच्यावर घरमालकाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार झाला होता..

त्या सांगतात मला पहिल्यांदा ती नैराश्यात जाते आहे हे देखील तिनेच सांगितले.. तिने मला एक दिवस फोन केला आणि म्हणाली मला रात्रीची खूप भयानक स्वप्न पडतात, मला झोप येत नाही. मी चार चार दिवस झोपताच नाहीये.. यानंतर जेव्हा आम्ही मानसोपचार तज्ज्ञांशी बोललो त्यावेळी आम्हाला जाणवले की तिच्या लहानपणी घडलेल्या त्या लैंगिक अत्याचाराचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला आहे.


प्राची ज्यांच्याकडे उपचार घेत होती त्या प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांनीही तिच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं पण ते करत असतानाच ते म्हणाले, प्राचीच्या जाण्यानंतर देखील तिचे कुटुंब उद्वस्थ झाले नाही ही त्यांना खूप सकारात्मक बाब वाटत असल्याचे तिची आई सांगते..

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.