MNS News: Marathi गया तेल लगाने म्हणणाऱ्या परप्रांतीयाला मनसेनं दाखवला हिसका

'मराठी गया तेल लगाने' म्हणणाऱ्या परप्रांतीयाला मनसेनं दाखवला हिसका..

महाराष्ट्रात राहून मराठी भाषा बोलण्यास नकार दिल्याच्या मुद्यावरून अनेकदा वाद निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईतील चारकोप मधील एअरटेल गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देण्याचा प्रकार तसेच वर्सोवा येथील डी मार्ट मधील कर्मचाऱ्या कडून 'मुझे मराठी नही आती मै हिंदी बोलुंगा' असे म्हणत वाद झाल्याचे प्रकार समोर आले आहे, असे असतानाच आता मुंबईच्या पवई येथील एल अँड टी कंपनीतील सुरक्षारक्षकाकडून देखील मराठी भाषेविषयी अपमान जनक वक्तव्य बोलले गेल्याचा प्रकार पुढे आला आहे. सुरक्षारक्षकाने मराठीत बोलावे असं आग्रह धरणाऱ्या तरुणांसोबत वाद घालताना 'मुझे मराठी आती नही हिंदी बोलता हु मराठी गया तेल लगाने' असे मराठी भाषेविषयी अपमान जनक वक्तव्य केल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात मनसेने उडी घेत सुरक्षारक्षकाला कानशिलात लगावताच त्या सुरक्षा रक्षकाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसाची माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com