Mohol News: Umesh Patil vs Rajan Patil ZP Election वरून मोहोळमध्ये पुन्हा राजकारण तापलं | Sakal News

जिल्हा परिषद निवडणुकीत मोहोळच्या दोन पाटलामध्ये पुन्हा जुपंली. माजी आमदार, राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील दोघांमध्ये वाकयुद्ध

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील राजकारण पुन्हा तापलं असून, ‘मोहोळच्या दोन पाटलां’मधील जुंपली एकदा नव्याने चर्चेत आली आहे. माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत, 'चॅलेंज आपल्या बरोबरच्या माणसाचं स्वीकारायचं असतं. कोणाचंही चॅलेंज स्वीकारलं तर लोक हसतील. कुस्ती ही पैलवानासोबत होते,' असे म्हणत हातवारे करत टाळी वाजवून टोला लगावला. 'अशा लोकांसोबत कुस्ती कशी काय होऊ शकते,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या टीकेला प्रत्युत्तर देताना उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर पलटवार केला. 'माझ्यासमोर लढायला पैलवानच लागेल. ते काय आहेत, हे त्यांनी टाळी वाजवून दाखवून दिलं आहे,' असे म्हणत त्यांनी राजन पाटील यांची खिल्ली उडवली. तसेच, “ज्या पद्धतीने त्यांनी हातवारे करत टाळी वाजवली, त्यातून त्यांची मनोवृत्ती विकृत स्वरूपाची असल्याचं दिसतं,” असा आरोपही उमेश पाटील यांनी केला आहे. या दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकारण अधिकच तापले असून, ‘दोन पाटलांची जुंपली’ पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com