ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते नाना पाटेकर यांचा जीवनप्रवास हा प्रचंड संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचे एक जिवंत उदाहरण आहे. अत्यंत सामान्य कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीतून आलेल्या नानांनी वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. पोटाची खळगी भरण्यासाठी चित्रपटांची पोस्टर्स रंगवणे, चुना मारणे आणि छोटी-मोठी कामे करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे मुंबईच्या रंगभूमीवर आणि नंतर हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला. 'परिंदा', 'क्रांतिवीर', 'अग्निसाक्षी' आणि 'नटसम्राट' यांसारख्या कलाकृतींतून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. केवळ चित्रपटांपुरते मर्यादित न राहता 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यांनी उभे केलेले कार्य आजही संपूर्ण देशासाठी आदर्श ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.