नारायण गडावर Manoj jarange यांच्या हस्ते महापूजा | Narayan Gad | Ashadhi Ekadashi 2025

Ashadhi Ekadashi 2025: बीडच्या धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगडावर आषाढी एकादशीनिमित्त नगद नारायणाची महापूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली; सलग दुसऱ्या वर्षी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते महापूजेचा विधी, पंचक्रोशीतील भाविकांची गडावर मोठी गर्दी, मराठा आरक्षणासाठी सरकारला सुबुद्धी यावी अशी प्रार्थना जरांगे पाटलांची..

बीड जिल्ह्यातील धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र नारायण गडावर आषाढी एकादशीनिमित्त नगद नारायणाची महापूजा मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या विशेष महापूजेचा मान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आणि श्रीक्षेत्राचे महंत शिवाजी महाराज यांना मिळाला. सलग दुसऱ्या वर्षी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा संपन्न झाली. प्रत्येक आषाढी एकादशीला पंचक्रोशीतील हजारो भाविक नारायणगडावर दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाही पहाटे महापूजेच्या विधीनंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. यावेळी नगद नारायणाच्या चरणी साकडं घालत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला सुबुद्धी यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली निघावा, अशी प्रार्थना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com