Nashik News: नाशकात दिवसाढवळ्या अल्पवयीन तरुणाची हत्या, डोक्यात दगड टाकला अन्..

Crime News: नाशिकच्या कामटवाडे परिसरात एका अल्पवयीन तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. किरण चौरे असे खून झालेल्या तरुणाचे नाव. चौघांनी मिळून ही हत्या केल्याचं समजतंय. हत्येनंतर मारेकरी फरार..

Nashik News: नाशिक शहरात पुन्हा एकदा खळबळजनक घटना समोर आली असून, कामटवाडे परिसरात दिवसाढवळ्या एका अल्पवयीन तरुणाचा खून करण्यात आला आहे. किरण चौरे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार किरण चौरे हा सराईत गुन्हेगार होता आणि दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हत्या केल्यानंतर चारही मारेकरी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना गजाआड करण्यात येईल, असा विश्वास स्थानिक पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com