Pandharpur Ashadhi Ekadashi 2025| डोळ्यात साठवावे असे पंढरीनगरीचे दृश्य | Sakal News

Pandharpur Wari 2025: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात लाखो भाविकांची अलोट गर्दी; चंद्रभागेच्या स्नानासाठी पहाटेपासूनच उत्स्फूर्त गर्दी, टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरी भक्तिरसात न्हालेली, बघा थेट दृष्य..

दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरी भक्तांनी फुलून गेली आहे. आज सकाळपासूनच विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पंढरीमध्ये हजेरी लावली आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण पंढरपूर भक्तिमय वातावरणाने न्हालं आहे. यंदा सुमारे २० ते २२ लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून, पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या तिरी स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. पंढरीतील प्रमुख मठ-मंदिरांमध्ये विठोबाच्या नामस्मरणाचा जयघोष सुरू आहे आणि श्रद्धेच्या लाटांमध्ये ही नगरी अक्षरशः न्हाऊन निघाली आहे. या भक्तिरसात न्हालेल्या उत्सवाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Shivaji Era Stone Vessel Discovered at Pandharpur Vitthal Temple
Pandharpur Set for Major Upgrade; CM Orders Completion Within 2.5 Years
Eknath Shinde announcing development plans for Pandharpur and welcoming new leaders into Shiv Sena.
Vitthal Rukmini temple puja registration April July
Marathi News Esakal
www.esakal.com