Vitthal Rukmini Murti Lepana: सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लेपन प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या (ASI) तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानुसार ही केमिकल लेपन प्रक्रिया पार पाडली जात आहे. मूर्तींचे आयुष्य वाढवणे आणि त्यांचे सौंदर्य जपणे हा या प्रक्रियेमागचा मुख्य उद्देश आहे. या महत्त्वाच्या कामासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पुढील तीन दिवस भाविकांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरी श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेल्या भाविकांनी निराश न होता संत नामदेव पायरीवरून मुखदर्शन घेण्यास सुरुवात केली असून तेथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.