Pandharpur News: विठुरायाच्या मंदिराला फुलांची अप्रतिम सजावट! | New Year Celebration | Sakal News

Pandharpur News: नववर्षाच्या स्वागतासाठी श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात भव्य फुलांची आरास.. गाभाऱ्यासह प्रमुख भागांत एक टन फुलांची सजावट, पुणे येथील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांच्या वतीने आयोजन; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी..

New Year Celebration: नववर्षाच्या स्वागतासाठी आज श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात आकर्षक आणि मनोहारी फुलांची सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्यासह मंदिर परिसरात करण्यात आलेल्या या विशेष आरासेमुळे देवाचे दर्शन अधिकच प्रसन्न आणि मनमोहक झालं असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने विठ्ठल–रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिर सजावटीसाठी ऑर्किड, लिव्हडेजी, ड्रॅसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे एक टन फुले वापरण्यात आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com