Mahadev Munde Case: Dumped Data gitya gitte ला गजाआड करणार का ?| Devendra Fadnavis | Beed | Sakal K1

Beed Mahadev Munde Case: परळी व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात २१ महिन्यांनी SIT सक्रिय, ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पोलिसांचा तपास सुरू, मनोज जरांगेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची हस्तक्षेप, डम्प डेटा तपासातून आरोपींचा शोध लावण्याची शक्यता..

Mahadev Munde: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा २१ महिन्यांपूर्वी निर्घृण खून झाला होता, मात्र एवढ्या काळात बीड पोलिसांना एकाही आरोपीचा शोध लागलेला नव्हता. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात विषारी रसायन प्राशन केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर एसपींनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं. या घटनेनंतर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि राज्य सरकारवर दबाव वाढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com