Mahesh Landge on Ajit Pawar: Sharad Pawarचं नाव घेत लांडगेंनी दादांचा समाचार घेतला | BJP vs NCP | Sakal News

Mahesh Landge on Ajit Pawar: पिंपरी-चिंचवडच्या विकासाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार महेश लांडगेंची अजित पवारांवर तीव्र टीका; 'ज्यांच्या तालमीत वाढले त्यांचेही नाही झाले, मला नीच दर्जाचं राजकारण नको' असे म्हणत दादांचा समाचार..

भाजप आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘पिंपरी-चिंचवडमध्ये कुणाला मोठंच केलं नाही', अशा शब्दांत लांडगेंनी अजितदादांच्या राजकीय शैलीवर टीका केली. लांडगे म्हणाले, ‘मला असलं नीच दर्जाचं राजकारण करायचं नाही. कुणाला बदनाम करून राजकारण करायचं नाही, समाजकारण करायचं’. त्यांच्या वक्तव्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. यानंतर त्यांनी कटाक्ष टाकत म्हटलं, ‘ज्यांच्या तालमीत वाढले ते त्यांचे नाही झाले, तर भाजपबद्दल काय बोलणार?’ अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांच्या निष्ठेबाबत आणि पक्षांतर्गत समीकरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा रणधुमाळीचा काळ असून, शहरात सर्वच पक्षांकडून प्रचार आणि राजकीय टीका-टिप्पणीचा जोर वाढलेला आहे. लांडगेंच्या या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवरही चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Sunil Tatkare Reacts to Political Strategy Buzz
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics
Chandrashekhar Bawankule latest statement on paper leak
Sunetra Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com