पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

भिंगार बंदच्या इशाऱ्याने प्रशासनावर दबाव वाढला; निष्पक्ष चौकशी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

अहिल्यानगर शहरातील भिंगार उपनगरात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वातावरण अत्यंत तापले आहे. गुलाल उधळण्यावरून पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जात दीपक वागसकर या तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला असून, कार्यकर्त्यांनी पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे आणि सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्यावर थेट आरोप केले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची बदली होईपर्यंत भिंगार बंद ठेवण्याचा आणि श्रींच्या मूर्तींचे विसर्जन न करण्याचा आक्रमक निर्णय मंडळांनी घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी भिंगार वेशीजवळ ठिय्या आंदोलन करत गणेशमूर्ती रस्त्यावरच ठेवल्याने प्रशासनासमोर मोठे धर्मसंकट निर्माण झाले आहे.प्रशासनाच्या या कारवाईच्या निषेधार्थ भिंगार बंदची हाक देण्यात आली असून सर्व गणपती मंडळांनी विसर्जन थांबवले आहे. कार्यकर्त्यांनी विसर्जनासाठी आणलेल्या गणेशमूर्ती रस्त्यावरच ठेवल्याने विसर्जन मार्गावर विचित्र पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com