Bopdev Ghat Accident : बोपदेव घाटातील अपघातात सिद्धेश्वर राजेंचा मृत्यू; राजे कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपला

बोपदेव घाट अपघातात सिद्धेश्वर राजे यांचा मृत्यू. भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू; वाल्हेकरवाडीत शोककळा.

पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील सिद्धेश्वर राजे या उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा समावेश आहे. सिद्धेश्वर हा राजे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या सिद्धेश्वरच्या अचानक जाण्याने नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बोपदेव घाटातील या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा भरधाव वाहनांचा आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...