पुण्यातील कॅम्प परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना.. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने टायर निखळलेली कार भरधाव वेगात रस्त्यावर चालवली, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. ही कार कल्याणीनगर ते रेल्वे स्टेशनपर्यंत विनाकारण झिगझॅग पद्धतीने चालवली जात होती. कुठल्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती. अशातच ‘सकाळ’ माध्यम समूहातील व्हिडीओ एडिटर सत्यजित सरवदे यांनी प्रसंगावधान राखत जीवाची पर्वा न करता या कारचा पाठलाग सुरू केला. कारचं चाक निखळलेलं असूनही चालक वेग न कमी करता कार रस्त्यावर चालवत होता. सरवदे यांनी योग्य वेळ साधून गाडी अडवण्यात यश मिळवलं आणि तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यांच्या धाडसामुळे आणि सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आणि अनेकांचे जीव वाचले. या प्रकारानंतर मद्यधुंद चालकाला ताब्यात घेण्यात आले असून बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यजित सरवदे यांनी दाखवलेलं धाडस आणि नागरी जबाबदारी समाजासाठी आदर्शवत ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.