पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक हुंडाबळीचा प्रकार समोर आला आहे. सासरच्या छळाला कंटाळून दिप्ती चौधरी या विवाहितेने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महिलांवरील अत्याचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी दिप्तीच्या आई-वडिलांशी संवाद साधला. यावेळी दिप्तीच्या पालकांनी भावूक शब्दांत आपली व्यथा मांडत, ' सततच्या छळाला कंटाळूनच आमच्या लेकीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं,' असा गंभीर आरोप केला आहे. दिप्तीच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार, लग्नावेळी तब्बल ५० तोळे सोनं देण्यात आलं होतं. मात्र तरीही सासरच्यांकडून २५ लाख रुपयांच्या कारची मागणी करण्यात आली. एवढंच नव्हे तर जावयाच्या व्यवसायासाठीही १० ते १५ लाख रुपये दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. तरीही हुंड्याच्या मागण्या आणि छळ थांबला नाही, असं पालकांनी सांगितलं. तसेच, दिप्तीला मुलगी झाल्यानंतर मानसिक त्रास देण्यात आला. दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान तिच्यावर गर्भपातासाठी दबाव आणल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या सगळ्या मानसिक आणि शारीरिक छळामुळेच दिप्तीने आत्महत्येचा मार्ग निवडल्याचा दावा पालकांनी केला आहे. दिप्तीच्या आई-वडिलांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, महिलांवरील हुंडाबळी आणि कौटुंबिक छळ थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.