पुण्यातील हडपसर परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दीप्ती चौधरी असं या विवाहितेचं नाव असून, गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांवरून सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे दीप्तीची सासू सुनीता चौधरी या सोरतापवाडी गावाच्या विद्यमान सरपंच आहेत. सत्तास्थानी असतानाही सुनेवर अन्याय होत असल्याचा आरोप झाल्याने या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दीप्तीच्या मृत्यूनंतर तिच्या आई हेमलता मगर यांनी लेकीसोबत सासरी घडलेल्या छळाची माहिती दिली असून, मुलीवर झालेल्या अन्यायाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत असून, पुढील चौकशीतून नेमकं काय सत्य आहे ते समोर येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.