Ganesh Kale: Ayush Komkar प्रकरणातील आरोपीच्या भावाला भर रस्त्यात संपवलं | Andekar News | Sakal News

Pune Crime News: पुण्यातील कोंढवा परिसरात दुपारी तीन वाजता गोळीबाराचा पुन्हा थरार बघायला मिळाला. आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ गणेश काळे याच्यावर गोळीबार करण्यात आला. नेमकं काय घडलं? बघाच व्हिडीओ..

पुण्यातील कोंढवा परिसरात दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. आंदेकर टोळीतील सदस्य दत्ता काळेचा भाऊ गणेश काळे याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोटारसायकलवरून आलेल्या चौघा हल्लेखोरांनी खडी मशीन चौकात गणेश काळेवर सहा राऊंड फायर केले. एवढ्यावरच थांबणार नाही, गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली. या हल्ल्यात गणेश काळे जागीच ठार झाला. गणेशचा भाऊ दत्ता काळे हा आंदेकर टोळीतील सक्रिय सदस्य असून आयुष कोमकर हत्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याच वादाची ही पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Katraj-Kondhwa Road
Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute
Katraj-Kondhwa Traffic Jam
Pune influencer arrest
Marathi News Esakal
www.esakal.com