Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पण पिण्याच्या पाण्याचं करायचं काय? | Khadakwasla | Temghar | Panshet

Mutha River water level rises: पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदी पात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे जलसाठा लक्षणीय वाढला आहे.

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. विशेषतः खडकवासला धरण ७८ टक्के भरले असून, यावर्षीचा एकूण साठा मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांनी जास्त नोंदवला गेला आहे. गेल्या तीन दिवसांत धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांमध्ये पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com