पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा धागा थेट २० एप्रिल २०२५ रोजी कात्रजमधील संतोषनगर परिसरात झालेल्या शुभम सुभाष चव्हाणच्या हत्येशी जोडला जात आहे. जागेच्या वादातून शुभम चव्हाणची हत्या झाली होती. या प्रकरणात मंदार किवळे याच्यावर आरोपी म्हणून नाव आले होते. आता शिवाजीनगर कोर्टाबाहेर त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे जुन्या हत्याकांडाचा आणि नव्या घटनेचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या हल्ल्यामागे नेमके कारण काय, जुन्या वादाचा यात काही संबंध आहे का ? बघा हा व्हिडीओ...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.