Rohit Pawar ना Defamation Notics, Manikrao Kokate वर भडकले | Politics | Sakal K1
तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असं म्हणत आमदार रोहित पवारांनी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावलेत. कारण, कोकाटेंनी रोहित पवारांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. कृषीमंत्री असताना माणिकराव कोकाटे विधानपरिषदेत बसून मोबाईल रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. रमी प्रकरणामुळे त्यांना आपले कृषिमंत्रिपद गमवावे लागले. त्यांचे खाते बदलून क्रिडा व युवक कल्याण हा विभाग त्यांना देण्यात आला आहे. तरी, कृषिमंत्रिपद गमावल्यानंतर कोकाटेंनी मोठं पाऊल उचलले आहे. ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.