Rupali Chakankar आणि Rupali Patil पैकी कोणाला झापलं? | Sakal News

NCP News: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ संघर्ष चिघळला! फलटण डॉक्टर प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे यांचा थेट रुपाली चाकणकरांवर आरोप, पक्षाने मागवला ७ दिवसांचा खुलासा, अखेर ठोंबरे पती-वकिलांसह पुण्यात अजित पवारांची भेट घेतली..

एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असं म्हणतात आणि नेमकं हेच दृश्य सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. पक्षातील दोन महिला नेत्या, रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे, यांच्यातील स्पर्धा आता उघडपणे समोर आली आहे. फलटणमधील डॉक्टर प्रकरणानंतर ठोंबरे यांच्या निकटवर्तीयांवर गुन्हे दाखल झाले, त्यानंतर त्यांनी थेट चाकणकरांवर आरोप करत माध्यमांमधून टीकेचा भडिमार केला. इतकंच नाही, तर पुण्यात आंदोलनही केलं. पक्षाने त्यांना सार्वजनिक वक्तव्य टाळण्याचा इशारा दिला होता, तरीही त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ठोंबरे यांना सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे पत्र देण्यात आले. त्यानंतर आज त्या आपल्या पती व वकील विजय ठोंबरे आणि निवडक कार्यकर्त्यांसह अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यांच्या भूमिकेमुळे पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील कारवाईबाबत सर्वांचे लक्ष अजित पवारांच्या निर्णयाकडे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

MLA Uttamrao Jankar :
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 
NCP Internal Conflict Chhagan Bhujbal sunil tatkare sunetra pawar
NCP Merger Issue Closed, Clarifies Shashikant Shinde Amid Political Buzz
Marathi News Esakal
www.esakal.com