समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ चॅनल ९७ वर एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला आहे. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या एका बोलेरो टेम्पो पिकअपला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात ७ भक्तांचा जागीच मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना सर्वप्रथम धामणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र बहुतेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. अपघातापूर्वीचे काही व्हिडिओही आता समोर आले असून, नवरात्रोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे वर्धा आणि अमरावती परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.