सांगलीच्या गोकुळनगरमध्ये थरार! नेमकं काय घडलं?

Sanagli Crime News: सांगलीतील गोकुळनगर रक्ताने लाल! दोन महिन्यांपूर्वीच्या खुनाचा वचपा काढण्यासाठी तरुणाचा कोयत्याने सपासप वार करून खून, शहरात टोळीयुद्धाची प्रचंड दहशत.

Sangli Gokulnagar Murder: सांगली शहरातील गोकुळनगर परिसरात संध्याकाळच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक कोयते उपसून एका तरुणाला घेरले आणि त्याच्यावर सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या भीषण आणि थरारक हल्ल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली असून दुकानांची शटरं पटापट खाली आली. प्राथमिक तपासात ही घटना साधी गुन्हेगारी नसून दोन महिन्यांपूर्वी झालेल्या एका खुनाचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचे समोर येत आहे. 'खून का बदला खून' या मानसिकतेतून घडलेल्या या घटनेमुळे सांगलीत पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे रक्तरंजित चक्र सुरू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास तीव्र केला असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com