Satara Bank Election news: सातारा जिल्हा बँकेत महायुतीत ठिणगी! शिवेंद्रराजेंनी सांगितला माघारीमागचा घटनाक्रम

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीत मतभेद. शिवेंद्रराजे भोसले यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचना आणि माघारीमागची भूमिका स्पष्ट केली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या संपूर्ण घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वरिष्ठ नेत्यांनी सुचवलेली नावे आणि दिलेल्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली होती. मात्र, चर्चा होऊनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने वेगळा निर्णय घेतल्याचा दावा शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळण्यासाठी आणि महायुतीमधील एकोपा कायम ठेवण्यासाठी आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेतील सत्तासमीकरण, महायुतीतील समन्वय आणि भाजपच्या भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...