पावसाळा सुरु झाला की निसर्गरम्य दृष्य आणि पांढरे शुभ्र धबधबे, यातच पावसाळ्यात नैसर्गिक विविधतेने नटलेले निसर्ग पाहण्यासाठी देशभरातील पर्यटकांची पावले साताराकडे वळतात. सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्नतेने सजलेल्या विविध पर्यटनस्थळांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. सध्या डोंगरदऱ्यांवर हिरवळीचा गालिचा पसरल्यामुळे परिसर मंत्रमुग्ध करणारा दिसत आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध कास तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत असून, सांडव्यावरून खळखळ पाणी सोडले जात आहे. याच परिसरातील आणखी एक आकर्षण असलेला वजराई-भांबवली धबधबादेखील आता तीन टप्प्यांमधून जोमाने कोसळत आहे. हिरव्या डोंगररांगा आणि नितळ शुभ्र पाण्याचा संगम पाहताना पर्यटक भारावून जात आहेत. साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी झगलवाडीचे निलेश सुतार (vata_mahirapi) यांनी कास तलाव आणि वजराई धबधब्याचे नयनरम्य दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद केली आहेत. या व्हिडिओंमधून पावसाळ्यातील साताऱ्याचे अप्रतिम सौंदर्य अनुभवता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.